भाजपने निवडणूक निधीचा स्त्रोत जाहीर करावा

संतप्त मायावतींचा मोदी सरकारवर हल्लाबोल : भाजप नेत्यांच्याही मालमत्तेची चौकशी करा 

नवी दिल्ली – आयकर विभागाने मायावतींचे बंधु आणि त्यांच्या पत्नींचा चारशे कोटी रूपयांचा नॉयडा भागातील बेनामी भूखंड जप्त केल्यामुळे मायावती अजून भडकलेल्याच आहेत. त्यांनी आज मोदी सरकारवर पलटवार करताना भाजपने त्यांना निवडणुकीत मिळालेल्या निधीचा स्त्रोत जाहीर करावा अशी मागणी केली आहे. शोषित समाजातील लोकांनी केलली व्यावसायिक प्रगती भाजपला पहावत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात दोन हजार रूपयांचा निवडणूक निधी जमवला आहे. त्यांनी तो कोठून जमवला याची माहिती त्यांनी जनतेला सादर करावी अशी मागणीही मायावती यांनी केली आहे. त्यांचा हा निधी बेनामी असून त्यांना हा निधी कोठून मिळाला याची कोणतीही माहीती उपलब्ध नाही असे त्यांनी म्हटले आहे. या निधीचा वापर करून शोषित आणि मागास वर्गाची मते भाजपने विकत घेतली असा आरोपही त्यांनी केला आहे. मागास व शोषित वर्गातील लोकांनी केलेली प्रगती भाजपला पहावत नाही म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची कारवाई सुरू केली असल्याचाही त्यांचा आरोप आहे. शोषित वर्गाचा आवाज दाबून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.

जेव्हा या सरकारकडून माझ्या सारख्यांना सुद्धा जर सोडले जात नसेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ते काय हाल करतील याची भीती तुम्हा बाळगू नका असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवताना त्यांनी स्वताचेही आत्मचिंतन करावे असा सल्लाहीं त्यांनी दिला आहे. आपण हरिश्‍चंद्राचे अवतार आहोत असा जर त्यांचा दावा असेल तर त्यांनी सत्तेवर आल्यानंतर आपल्याही पक्षाच्या लोकांच्या वाढलेल्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मायावतींचे बंधु आनंदकुमार आणि त्यांच्या पत्नी व्ही लता यांच्या नावावर नॉयडाच्या सेक्‍टर 94 मध्ये हा सात एकरांचा व्यापारी प्लॉट आहे. तो आयकर खात्याने जप्त केला आहे. त्यावर एक पंचतारांकित हॉटेल आणि मॉल उभारला जाणार होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)