‘रोड-शो’साठी मोदींकडून ‘इतक्या’ कोटींची उधळपट्टी – आप नेत्याचा आरोप 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ एप्रिल रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करण्याच्या एका दिवसापूर्वी म्हणजेच २५ एप्रिल रोजी एक भव्य ‘रोड-शो’ आयोजित केला होता. पंतप्रधानांच्या या ‘रोड-शोला’ मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित राहिल्याने देशभरामध्ये मोदींच्या या ‘रोड-शो’ची दखल घेण्यात आली होती.

दरम्यान, मोदींच्या रोड-शो’ला दोन दिवस उलटल्यानंतर आज आम आदमी पक्षाकडून या रोड-शो विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते संजय सिंग यांनी सदर तक्रार वाराणसीच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली असून त्यांनी पंतप्रधानांनी या रोड-शो’मध्ये खर्च करण्यावर घालून देण्यात आलेली ७० लाखांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे.

संजय सिंग यांनी पंतप्रधानांच्या रोड-शो’मध्ये करण्यात आलेल्या खर्चाचा संपूर्ण लेखाजोखा निवडणूक अधिकाऱ्यांपुढे मांडला असून सिंग यांच्या हिशोबानुसार मोदींनी या रोड-शो’साठी तब्ब्ल १.२७ कोटी रुपये खर्च केले आहेत.

याबाबत वाराणसी निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात संजय सिंग म्हणतात, “भाजपच्या विविध नेत्यांनी वाराणसी येथे पोहोचण्यासाठी वापरलेल्या खाजगी विमानांचा खर्च ६४ लाख आहे तर १०० भाजप नेत्यांनी वाराणसी येथे येण्यासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च १५ लाख एवढा आहे. भाजप कार्यकर्त्यांना वाराणसी येथे आणण्यासाठी रेल्वे तिकिटांवर २० लाख इतका खर्च करण्यात आला आहे. उपस्थितांचे जेवण ५ लाख, प्रचार सामग्री ५ लाख व सोशल मीडियावरील जाहिरात २ लाख असा हा एकंदरीत खर्च आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)