‘त्या’ वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हा यांची सारवा-सारव

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वपक्षीयांनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. भाजपाची साथ सोडत काँग्रेसवासी झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी, मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे वक्तव्य मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलताना केले होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर सारवा-सारव केली आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी, मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर सर्वच स्तरांमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका करण्यात येत होती. त्यामुळे आज शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव करत, काल मी जे काही बोललो ते अनावधानाने बोलून गेल्याचे म्हंटले आहे. तसेच मला मौलाना आझाद म्हणायचे होते, पण चुकून मोहम्मद अली जीना तोंडातून बाहेर पडल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काल प्रचार सभेत ते बोलत असताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, काँग्रेस हे कुटुंब महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांचे आहे. यांचा देशाच्या प्रगतीत आणि स्वातंत्र्यात मोठा वाटा आहे. म्हणूनच मी येथे (काँग्रेसमध्ये) आलो आहे. मी काँग्रेस पक्षात पुन्हा मागे जाण्यासाठी आलेलो नाही, असे त्यांनी म्हंटले होते.

वाचा, काय म्हणाले होते शत्रुघ्न सिन्हा –

जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान – शत्रुघ्न सिन्हा 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.