सिल्व्हरस्टोन – फॉर्म्युला वन शर्यतींचा सम्राट अशी ओळख असलेला लुईस हॅमिल्टन याने ब्रिटिश ग्रां. प्रिं. फॉर्म्युला वन शर्यत जिंकली. या स्पर्धेच्या इतिहासातील त्याचे हे 7 वे विजेतेपद ठरले.
शर्यत सुरू असतानाच अखेरची फेरी सुरू असताना त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. मात्र, सपोर्ट स्टाफने दाखवलेल्या हिकमतीमुळे त्याने जिद्दीने शर्यत पूर्ण केली व करंडक पटकावला. फॉर्म्युला वन शर्यतींच्या कारकिर्दीतील 87 वे विजेतेपदही त्याने साकार केले.
52 फेरींच्या (लॅप) या शर्यतीत केवळ काही अंतर शिल्लक असतानाच त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. तरीही त्याने रेड बुलच्या मॅक्स वेस्टपेनला सहा सेकंदांनी पिछाडीवर टाकत 88 गुणांची नोंद केली व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हॅमिल्टन यंदाच्या मोसमात मर्सिडीजचे प्रतिनिधित्व करत आहे.