नवी दिल्ली – अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच आतुरता लागली आहे. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला.
परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमध्ये सर्वांसाठी हिरो होता. अभिनेत्री रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. म्हणूनच आता चाहत्यांना दुसऱ्या पर्वाचे वेड लागले आहे. अश्यातच दोन दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत ट्विटरवर ‘पुष्पा 2’ ऑफिशल टिझर प्रदर्शित केला आहे. सगळीकडे आता याच टीझरची चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. तर ‘पुष्पा 2’ साठी देखील त्याने मोठं मानधन आकारल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत देखील घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल 85 कोटी फी घेतली आहे. इतकी मोठी रक्कम आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला असल्याचं बोललं जातं आहे.