नवी दिल्ली : पुढील वर्षी होणा-या आॅलिंपिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बाॅक्सिंग चाचणीच्या अंतिम फेरीत सहा वेळच्या जगज्जेतेपद पटकविणा-या मेरी कोमने निखत झरीनचा ९-१ असा पराभव केला आहे. यासह झरीनचे टोकियो आॅलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. आता ५१ किलो वजनी गटात मेरी कोम हिच भारताचे प्रतिनिधित्व करेल.
Mary Kom defeats Nikhat Zareen 9-1 in 51-kg category finals of the women's boxing trials for Olympics 2020 qualifiers. (file pics) pic.twitter.com/wzOeLSmHaK
— ANI (@ANI) December 28, 2019
दरम्यान, महिलांच्या ५१ किलो गटाच्या चाचणीत माजी ज्युनियर जागतिक विजेत्या झरीनने राष्ट्रीय विजेत्या ज्योती गुलियाला पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली, तर मेरी कोमने रितू ग्रेवालला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
पुढील वर्षी चीनच्या वुहान मध्ये ३ ते १४ फेब्रुवारीदरम्यान आॅलिंपिक पात्रता स्पर्धा होणार आहे. या फेरीसाठी भारतीय संघात निवड करण्यासाठी ही बाॅक्सिंग चाचणी घेण्यात आली होती.