Davis Cup 2024 ,Yuki Bhambri and Saketh Myneni won : भारतीय टेनिस संघाने रविवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून डेव्हिस कप 2024 वर्ल्ड ग्रुप-एक मध्ये प्रवेश केला. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये वर्ल्ड ग्रुप एकमध्ये सहभागी होणार आहे तर पाकिस्तान ग्रुप दोनमध्ये राहील.
भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात 2-0 ने आघाडीवर केली. जिथे भारताच्या युकी भांबरी आणि साकेथ मायनेनी यांनी पाकिस्तान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दुहेरीच्या सामन्यात अकील खान आणि मुझम्मिल मोर्तझा यांचा पराभव केला. दुहेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानने बरकतुल्लाच्या जागी अकील खानचा समावेश केला होता.
भांबरी आणि मायनेनी जोडीने 2 तास चाललेल्या दुहेरीच्या सामन्यात पाकिस्तानी जोडीचा 6-2, 7(7)-6(6) असा पराभव केला. 2024 च्या डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप एक च्या प्ले-ऑफ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग आठवा विजय आहे.
Indian tennis roars in victory at @DavisCup 🎾🇮🇳
Yuki Bhambri and Saketh Myneni showcased brilliance, sealing the deal with a stellar 6-2, 7-6(5) win against Aqeel Khan and Muzammil Murtaza.👏
India takes a decisive 3-0 lead against Pakistan, advancing to World Group I.#IndvPak pic.twitter.com/TciNN1Q5nk— All India Tennis Association (@AITA__Tennis) February 4, 2024
रामकुमार रामनाथन आणि श्रीराम बालाजी यांनी डेव्हिस चषक विश्व ग्रुप -एक प्ले-ऑफच्या पहिल्या दिवशी आपापले एकेरी सामने जिंकले होते. दुस-या दिवशी भारताने दुहेरीचा सामना जिंकून 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. दरम्यान, पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथनने ऐसाम-उल-हक कुरेशीचा 6(7)-7(3), 7(7)-6(4), 6-0 असा पराभव केला. तर श्रीराम बालाजीने अकील खानचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.