Ramkumar, Balaji power India to 2-0 lead over Pakistan : डेव्हिस चषक विश्व गट 1 च्या प्ले-ऑफ सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पाकिस्तानवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इस्लामाबादमध्ये भारतासाठी, रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी (Sriram Balaji and Ramkumar Ramanathan)या दोघांनी आपापले सामने जिंकले.
पहिल्या फेरीच्या सामन्यात, रामकुमार रामनाथनने शनिवारी इस्लामाबाद येथे झालेल्या डेव्हिस चषक विश्व गट एक प्ले-ऑफ लढतीच्या चुरशीच्या सलामीच्या एकेरीच्या लढतीत ऐसाम-उल-हकचा पराभव करून भारताला पाकिस्तानवर 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. रामकुमारने इस्लामाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्साही ऐसामकडून पहिला सेट गमावला होता, परंतु त्याने शानदार पुनरागमन करत 6-7(3), 7-6(4), 6-0 असा विजय मिळवला.
त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात भारताच्या श्रीराम बालाजीने शानदार खेळ करताना अकील खानचा एक तास 15 मिनिट चाललेल्या सामन्यात 7-5, 6-3 असा पराभव केला आणि पाकिस्तानवर 2-0अशी आघाडी घेतली. आता रविवारी म्हणजे उद्या (दि.4) दुहेरी आणि रिव्हर्स एकेरीचे सामने होणार आहेत. रिव्हर्स एकेरीमध्ये पहिल्या दिवसातील प्रतिस्पर्ध्यांची अदलाबदल केली जाते.
Ramkumar Ramanathan fights to a 6-7(3) 7-6(4) 6-0 victory, and Sriram Balaji dominates with a solid 7-5 6-3 win, steering Team India to a stellar 2:0 lead against Pakistan in the @DavisCup World Group 1 Playoff! 👏😍 #IndvPak #DavisCupGlory pic.twitter.com/oyQqCacVmg
— All India Tennis Association (@AITA__Tennis) February 3, 2024
1964 मध्ये केला होता पाकिस्तानचा शेवटचा दौरा ….
शेवटच्या वेळी भारतीय डेव्हिस कप संघाने 1964 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, जेव्हा टीम इंडियाने यजमानांचा 4-0 असा पराभव केला होता.
युकी आणि मायनेनी दुहेरीसाठी उतरणार मैदानात…
भारताच्या युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांचा रविवारी टेनिस दुहेरीच्या लढतीत मुझम्मिल मोर्तझा आणि बरकत उल्लाह यांच्याशी सामना होईल.
Global showdown alert! 🎾
Watch the India vs. Pakistan Davis Cup clash live action on Sony Sports Ten 2/HD, PTV Sports HD, and Tennis Channel. 🇮🇳🆚🇵🇰
Let the cross-court excitement begin!
#TennisFever #DavisCup pic.twitter.com/ssIX1dpeQi
— All India Tennis Association (@AITA__Tennis) February 3, 2024
123 वर्षांपूर्वी सुरू झाला डेव्हिस कप , टेनिसचा विश्वचषक अशी ओळख….
ऑलिम्पिक खेळ सुरू झाल्यानंतर चार वर्षांनी 1900 मध्ये डेव्हिस कप सुरू झाला. याला टेनिसचा विश्वचषक असेही म्हणतात, कारण यात 5-6 खेळाडूंचा संपूर्ण संघ भाग घेतो. संघांच्या खेळाडूंमधील सामन्यांनंतर, सामन्यातील विजयाच्या आधारे देश विजेता मानला जातो.
या स्पर्धेत आतापर्यंत 16 संघ चॅम्पियन झाले आहेत. अमेरिकेने सर्वाधिक 32 विजेतेपदे जिंकली आहेत. तसेच डेव्हिस कप 2023 चे विजेतेपद इटलीने जिंकले आहे. संघाने तब्बल 47 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. या संघाने स्पेनमधील मालागा येथे 28 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला होता.
भारत 3 वेळा ठरला होता उपविजेता…
1966 मध्ये डेव्हिस कपमध्ये भारत उपविजेता ठरला होता. 1974 मध्येही उपविजेते ठरला होता. याशिवाय 1987 मध्येही भारताने अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी भारताला स्वीडनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.