Davis Cup 2024, India blank Pakistan 4-0 to enter World Group I : भारतीय टेनिस संघाने रविवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून डेव्हिस कप 2024 वर्ल्ड ग्रुप-एक मध्ये प्रवेश केला. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये वर्ल्ड ग्रुप एकमध्ये सहभागी होणार आहे तर पाकिस्तान ग्रुप दोनमध्ये राहील.
भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात 2-0 ने आघाडीवर केली. जिथे भारताच्या युकी भांबरी आणि साकेथ मायनेनी यांनी पाकिस्तान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दुहेरीच्या सामन्यात अकील खान आणि मुझम्मिल मोर्तझा यांचा पराभव केला. दुहेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानने बरकतुल्लाच्या जागी अकील खानचा समावेश केला होता.
भांबरी आणि मायनेनी जोडीने 2 तास चाललेल्या दुहेरीच्या सामन्यात पाकिस्तानी जोडीचा 6-2, 7(7)-6(6) असा पराभव केला. 2024 च्या डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप एक च्या प्ले-ऑफ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग आठवा विजय ठरला.
Indian tennis roars in victory at @DavisCup 🎾🇮🇳
Yuki Bhambri and Saketh Myneni showcased brilliance, sealing the deal with a stellar 6-2, 7-6(5) win against Aqeel Khan and Muzammil Murtaza.👏
India takes a decisive 3-0 lead against Pakistan, advancing to World Group I.#IndvPak pic.twitter.com/TciNN1Q5nk— All India Tennis Association (@AITA__Tennis) February 4, 2024
यानंतरच्या म्हणजेच स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात ‘निकी कालियांदा पूना’चा याने मुहम्मद शोएबवर 6-3,6-4 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. हा सामना रामकुमार रामनाथन आणि अकील खान यांच्यात होणार होता पण नंतर लाइनअप बदल करण्यात आला. दरम्यान, पाचवा आणि अखेरचा सामना श्रीराम बालाजी आणि ऐसाम-उल-हक कुरेशी यांच्यात होणार होता, मात्र ही लढत न झाल्याने भारताने पाकविरुध्द ही स्पर्धा 4-0 ने जिंकली. 1964 नंतर भारतीय डेव्हिस कप संघाचा पाकिस्तानचा हा पहिला दौरा होता.
रामकुमार रामनाथन आणि श्रीराम बालाजी यांनी डेव्हिस चषक विश्व गट I प्ले-ऑफच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी आपापले एकेरी सामने जिंकले होते. पहिल्या दिवशी रामकुमार रामनाथनने ऐसाम-उल-हक कुरेशीचा 6(7)-7(3), 7(7)-6(4), 6-0 असा पराभव केला. तर श्रीराम बालाजीने अकील खानचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत आघाडी घेतली होती.
IND vs PAK, Davis Cup 2024 : दुहेरीतही पाक पराभूत! जागतिक गटात स्थान मिळवत भारतानं घेतली अजेय आघाडी…
भारत विरुद्ध पाकिस्तान : डेव्हिस कप 2024 टेनिस (स्कोअर आणि निकाल)
पहिला दिवस :
एकेरी : रामकुमार रामनाथनने ऐसाम-उल-हक कुरेशीचा 6(7)-7(3), 7(7)-6(4), 6-0असा पराभव केला
एकेरी : एन श्रीराम बालाजीने अकील खानचा 7-5, 6-3 असा पराभव केला.
दुसरा दिवस :
दुहेरी : युकी भांबरी/साकेथ मायनेनी कडून अकील खान/मुझम्मील मोर्तझा यांचा 6-2, 7(7)-6(6) पराभव.
एकेरी : निकी कालियांदा पूनाचाने मुहम्मद शोएबचा 6-3, 6-4 असा पराभव केला