आगारात बसून कळणार ‘लालपरी’चे लोकेशन

व्हीटीएस यंत्रणा : प्रवाशांसाठी वल्लभनगर आगारात बसविण्यात येणार पीआयएस सिस्टम

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वल्लभनगर आगारातून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आगारात बसचे लोकेशन (ठिकाण) व बसची अचूक वेळ समजणार आहे. यासाठी आगारात स्क्रिन बसविण्यात आल्या असून, लवकरच यंत्रणा सक्रिय होणार असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटीची डिजिटल वाटचाल सुरु करत व्हीटीएस (व्हीईकल ट्रॅकिंग सिस्टम) यंत्रणा सुरु करण्याची घोषणा तात्कालीन राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. तर, ही यंत्रणा प्रवाशांना मोबाइलवर दिसण्यासाठी व्हीटीएस मोबाइल ऍपची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे याला उशीर झाला. मात्र, आता याबाबत जोरात वटचाल सुरू करण्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यभरातील आगारात ही यत्रंणा बसविण्यात येत आहे.

वल्लभनगर आगारात आतापर्यंत आगार प्रमुखांनाच व्हीटीएस सिस्टम दिसत होती. मात्र, आता व्हीटीएसवर अवलंबून असणारी बसचे लोकेशन सांगणारी पेसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (पीआयएस सिस्टम) आता सर्व प्रवाशांना लवकरच डिजिटल स्क्रिनवर दिसणार आहे. यासाठी वल्लभनगर आगारात सहा स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. या स्किन लवकरच कार्यान्वित होणार असून, याचा फायदा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

काय आहे व्हीटीएस सिस्टम..?
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ज्या बसने प्रवास करायचे आहे, त्या बसची वेळ व ती सध्या कुठल्या ठिकाणी आहे याबाबतची माहिती या यत्रंणेमार्फत मिळणार आहे. तर, गाडीचा वेग व चालकांनी बस थांब्यावर किती वेळा गाडी थांबवली याबाबत माहिती मिळणार आहे.

प्रवाशांना अचूक माहिती मिळण्यासाठी व्हीटीएस यत्रंणा लवकरच कार्यान्वित होणार असून यासाठी आगारात स्किन बसविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना माहिती देण्यासाठी आगारात पीआयएस सिस्टम बसविण्यात येणार आहे.
– आर. बी. वरपे, आगारप्रमुख, वल्लभनगर आगार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.