यवतमाळ – एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुहानी ढोले असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालया येथील एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. ही घटना गुरुवारी (दि. 28 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांना घटनास्थळी दोन पानांचे पत्र मिळाले आहे. मात्र त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे याबाबतची माहिती उघडकीस आली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडूनही याबाबत काही माहिती देण्यात आली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केल आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच महाविद्यालयीतल एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुरुवारी प्रथम वर्षातील विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.