Narendra Modi : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आता जवळ आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. अनेक वर्षांनंतर राम लल्ला आपल्या महालात बसतील. अयोध्या बाबरी मशीद प्रकरणानंतर एका व्यासपीठावर श्रीरामाच्या (Ram Mandir) बालस्वरूपाची पूजा केली जात होती.
मात्र, आता राम लल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. संपूर्ण जगाचं अयोध्येतील राम मंदिराकडे लक्ष लागलं आहे. कारण शेकडो वर्षानंतर अयोध्येत राम मंदिर तयार झालं आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिरात भगवान राम लल्लाचा अभिषेक करणार आहेत. त्यानंतर अवघ्या महिनाभरात पंतप्रधान दुसऱ्या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीतील मुस्लीम देश अबुधाबीमध्ये बांधले जात आहे.
BAPS स्वामीनारायण संस्थेतर्फे बांधण्यात येत असलेल्या या मंदिराची उंची 108 फूट आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पश्चिम आशियातील हे सर्वात मोठे मंदिर असेल.
हे मंदिर तयार करण्यासाठी सुमारे 10 लाख 80 हजारांहून अधिक विटांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि एक लाख ऐंशी हजार घनमीटर वाळूचा खडक बसविण्यात आला आहे.
स्वामी ईश्वरचरणदास आणि स्वामी ब्रह्मविहारीदास यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना 14 फेब्रुवारी रोजी मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे या मंदिराचे देखील उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.