पुणे – जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 1 हजार 196 रुग्ण सापडले असून, 169 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या महिन्यात दिलासादायक म्हणजे मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये रुग्णसंखेत घट झाली आले. तर, मागील आठवड्याच्या तुलनेतही ही रुग्णसंख्या 24 ने घटली घटली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 537 रुग्ण बरे झाले असून, 490 जणांवर उपचार सुरू आहेत. मागील आठवड्यात (दि. 23 जून) म्युकरचे एकूण रुग्ण 1 हजार 151 तर, 16 जून रोजी 1 हजार 82 रुग्णसंख्या होती. मागील दोन आठवड्यांत या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र, मृत्यूच्या प्रमाणात किंचीत वाढ झाली आहे.
दरम्यान, जून महिन्यातील म्युकरची रुग्णसंख्या पाहिली तर 9 ते 16 जूनदरम्यान रुग्णांमध्ये 96 ने वाढ झाली. त्यानंतर ही संख्या दर आठवड्याला कमी होत आहे. 16 ते 23 जूनदरम्यान, 69 रुग्ण सापडले, तर 23 ते 30 जूनदरम्यान 45 सापडले.