सांगली – पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी एकाच्या नावाने पंधरा बनावट ईमेल आयडी तयार करून अर्ज भरून देण्यात आल्या प्रकरणी सांगली जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचा-यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
शिवानंद हनुमंत बोबडे असे बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बोबडे हा सन 2008 कालावधीत पोलिस दलात भरती झाला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी चाैकशीत ताे दाेषी ठरला. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बनावट ईमेल आयडी करुन पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केल्याप्रकरणी बोबडे याची खातेनिहाय चौकशी झाली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 1959 /25 मधील तरतुदीनुसार शिवानंद बोबडे यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केली आहे.