World Cup 2023 England vs Sri Lanka : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 25व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 157 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
या सामन्यात श्रीलंकेच्या मोठ्या विजयानंतर विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या विजयासह श्रीलंकेने विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ 2023 च्या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानचा 8-० असा पराभव केला आहे. त्याचबरोबर इंग्लंडला गेल्या पाच विश्वचषकांमध्ये श्रीलंकेवर मात करता आलेली नाही. याशिवाय यावेळी विश्वचषकात इंग्लंडच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
#CWC2023 #ENGvSL : गतविजेत्या इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप; श्रीलंकेनं 8 गडी राखून केला पराभव…
दरम्यान, विश्वचषकाच्या इतिहासात श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्धचा हा सलग पाचवा विजय आहे. 2007 पासून विश्वचषकात इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. गेल्या पाच विश्वचषकांमध्ये श्रीलंका इंग्लंडवर 5-0 ने आघाडीवर आहे. याशिवाय या विश्वचषकात इंग्लंडचा सलग तिसरा पराभव झाला आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामने गमावले आहेत.
विश्वचषकातील शेवटच्या 5 सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
2007 – श्रीलंका 2 धावांनी विजयी
2011 – श्रीलंका 10 गडी राखून विजयी
2015 – श्रीलंका 9 गडी राखून विजयी
2019 – श्रीलंका 20 धावांनी विजयी
2023 – श्रीलंका 8 गडी राखून जिंकला*
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडची कामगिरी अतिशय सामान्य होती. इंग्लंडच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. 85 धावांपर्यंत संघाने पाच विकेट गमावल्या होत्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. फलंदाजीनंतर गोलंदाजांना आपला प्रभाव सोडता आला नाही. श्रीलंकेने प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आणि विजय संपादन केला.