Nokia 105 Classic Launched: HMD Global ने नोकिया ब्रँड अंतर्गत एक नवीन फीचर फोन भारतात लॉन्च केला आहे. Nokia 105 Classic हा कंपनीचा नवीन फोन आहे. याआधी कंपनीने या सीरिजमधले दुसरे मॉडेल Nokia 105 4G 2023 लाँच केले आहे. नवीन परवडणाऱ्या Nokia 105 Classic बद्दल बोलायचे झाले तर हा फोन 2G कनेक्टिव्हिटी सह येतो. या फीचर फोनमध्ये इन-बिल्ट UPI सिस्टीम आहे.
नोकिया 105 क्लासिकची वैशिष्ट्ये –
Nokia 105 Classic मध्ये एक इनबिल्ट UPI अॅप आहे ज्यामुळे वापरकर्ते सुरक्षित आणि सुलभ पेमेंट व्यवहार करू शकतात. याशिवाय नोकियाकडून ग्राहकांना एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटीही दिली जात आहे.
नोकिया 105 क्लासिक फीचर फोन कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो जो वापरण्यास सोयीस्कर आहे. कंपनीचे म्हणणे आहे की फोन अनेक चाचणी प्रक्रियेतून गेला आहे आणि त्याची बिल्ड गुणवत्ता उत्कृष्ट आहे.
नोकियाचा हा फीचर फोन रेडिओ फंक्शनॅलिटीसह येतो, म्हणजेच यूजर्स फोनमध्ये हेडसेटशिवाय एफएम रेडिओ स्टेशन वापरू शकतात. या हँडसेटमध्ये 800mAh ची बॅटरी आहे.
नोकिया 105 क्लासिकची किंमत –
नोकिया 105 क्लासिक फोन भारतात सिंगल सिम आणि ड्युअल सिम पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फीचर फोन 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळू शकतो. हँडसेट चारकोल आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन चार वेगवेगळ्या प्रकारात येतो.