लुईस्टन – अमेरिकेतील मेन भागातील लुईस्टन येथे बुधवारी एका व्यक्तीने रेस्टॉरंट आणि बॉलिंग गल्लीमध्ये किमान 16 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर हा मारेकरी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
त्यानंतर शेकडो अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली तर घाबरलेले रहिवासी त्यांच्या घरात कोंडून राहिले. रॉबर्ट कार्ड असे या मारेकऱ्याचे नाव असल्याचे समजते आहे.
कार्ड हा फायरआर्म प्रशिक्षक असून या उन्हाळ्यात दोन आठवडे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सुटीवर होता. त्याने केलेल्या गोळीबारात किमान 16 लोक ठार झाले आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तर डझनभर लोक जखमी झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली आहे.