चिंबळी – मरकळ (ता. खेड) ग्रामपंचायतीत महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. माघाडे यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त मरकळ ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच स्मिता लोखंडे व सदस्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच लाला लोखंडे, व सर्व सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर उपस्थित होत्या.
यावेळी गावातील विशेष महिलांचा गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला व कुपोषणविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बचत गटाच्या महिलांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले व समर्पण ध्यानविषयी माहिती देण्यात आली. हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करून भेटवस्तू देण्यात आल्या.
ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोग अंतर्गत सात अंगणवाड्यांना खेळणी वाटप करण्यात आले. महिला बाल कल्याण अंतर्गत 10 टक्के निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने आशा वर्कर यांना मानधन वाटप करून उपस्थित सर्व महिलांना स्नेहभोजन देण्यात आले.