वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (तालुका हवेली) येथे तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दूचाकी रॅली काढून सामाजिक एकतेचा संदेश देत महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
वाघोली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वाहतूक शाखा महिला पोलिस कर्मचारी, महिला बचत गटातील महिला तसेच संस्थेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दुचाकी रॅली द्वारे वाघोली शहरातून महिलांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला.
यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील, प्रमोद भाडळे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुनंदा दाभाडे, वंदना दाभाडे, संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार,मीना सातव पाटील व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.