नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारात मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. २३ जानेवारी २०२४ ते १ एप्रिल या काळात पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी अधिक आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये महिला मतदार १६ हजार ९५९ तर १६ हजार २७६ पुरुष मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे पुरषापेक्षा महिलांची आघाडी आहे.
अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण ३६ लाख ४७ हजार ८८९ आहेत. १३ मे रोजी होणार्या मतदानासाठी एकूण ३ हजार ७३४ मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहेत. निवडणूक आयोगाने आॅनलाईन आणि आॅफलाईन नाव नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना घरबसल्या नाव नोंदणी करता येणार आहे.
आॅनलाईन सुविधा असल्याने २३ जानेवारी २०२४ ते १ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ३३ हजार २३५ मतदरांनी नाव नोंदणी केली आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मतदार नोंदणीत ९० टक्के नवमतदार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी त्यांच्या मनात उत्सुकता आहे.
वयोगटानुसार आकडेवारी (महिला)
१८ ते १९ वयोगटानुसार 4 हजार ६५५ पुरूष तर (महिला २ हजार ६९०), २० ते २९ वयोगट ८ हजार ४७६ (महिला- ९ हजार ३०२), ३० ते ७९ ३ हजार ११९, (महिला-५ हजार २२), ८० वयोगटातील पुढे २७ (महिला – २९) असे एकूण महिला मतदार १६ हजार ९५९ तर १६ हजार २७६ पुरुष मतदारांनी नोंदणी झाली आहे.