दौंड -शहरात आज पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असल्याने दौंड शहराला धक्का बसला आहे.
दौंड शहरातील गजानन सोसायटी परिसरातील एका 37 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
येथेच मंगळवारी (दि. 9) रोजी एक करोना बाधित रुग्ण आढळला होता. आज (बुधवारी) ही महिला रुग्ण करोना बाधित आढळल्याने शहरात आता एकच खळबळ उडाली आहे.