मुंबई – भाजप नेत्या चित्रा वाघ सध्या अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. उर्फीच्या अतरंगी ड्रेसिंगवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चित्र वाघ या यांनी केली आहे. यानंतर उर्फी आणि वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु झाली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत कंगना राणावत,केतकी चितळे यांचे देखील दाखले दिले होते. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अंजली दमानिया यांनी भाजपच्या जनआक्रोश रॅलीतील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. राजस्थानमधील अल्वर या ठिकाणचा हा व्हिडीओ असल्याचे समजते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर करत दमानिया म्हणतात,”भाजपच्या रमेश बिंधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपले काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असे अनेक सवाल दमानिया यांनी चित्रा वाघ यांना टॅग करत उपस्थित केले आहे.
प्रिय @ChitraKWagh ताई
भाजप च्या श्री @rameshbidhuri
यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? https://t.co/gcPfnPC4hv— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2023
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या ड्रेसिंगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना वारंवार प्रत्युत्तर दिल. तसेच आपण आपलं काम करत राहणार असल्याचे देखील उर्फी म्हणाली होती. त्यात इतर पक्षाच्या महिला नेत्या देखील वाघ यांच्याविरोधात मैदानात उतरल्यामुळे आता प्रकरण नेमकं कोणत वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.