Devendra Fadanvis on Anjali Damania – स्वतः कॅबिनेट मंत्री असतानाही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयाला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी स्पष्ट भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे.
या मुद्द्यावरून भुजबळ सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दबक्या आवाजात सुरू असलेली भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जाहीररीत्या बोलून दाखवल्याने याला अधिकच हवा मिळाली आहे. अशातच आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य करत चर्चेस पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? | Devendra Fadanvis on Anjali Damania
अंजली दमानिया यांनी केलेला दावा फडणवीस यांनी खोडून काढला आहे. ‘त्या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात असल्याने अशा पोस्ट टाकत असतील’ असं म्हणत फडणवीस यांनी त्यांचं बारामतीशी कनेक्शन जोडलं आहे.
आमच्या पक्षाचे निर्णय दमानिया घेत नाहीत, आम्हीच घेतो. भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
🕝 2.25pm | 2-2-2024 📍 Nagpur | दु. २.२५ वा. | २-२-२०२४ 📍 नागपूर.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Nagpur https://t.co/B75Gha93HD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2024
दमानियांची पोस्ट
“भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?” अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली होती.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
बावनकुळेंनीही दावा फेटाळला | Devendra Fadanvis on Anjali Damania
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी देखील, अंजली दमानिया यांनी केलेला दावा फेटाळला आहे. भुजबळ भाजपमध्ये येणार नसल्याची स्पष्टोक्ती देखील त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे भुजबळांना अंतर?
दरम्यान, छगन भुजबळ सातत्याने मराठा समाजाच्या ओबीसींमधून आरक्षणाच्या मागणीला विरोध करत आहेत. भुजबळ यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका नाही असे प्रफुल्ल पटेल यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) छगन भुजबळ यांना यानंतर देण्यात येतंय का अशी चर्चा सुरु झाली होती.
याबाबत बोलताना भुजबळ यांनी आज (शुक्रवारी) पक्षाने आपल्याला यानंतर दिलेले नाही असे स्पष्ट केले. पक्षातील कुठल्याच नेत्याने आपल्या विरोधात वक्तव्य केलं नाही, आपण कॅबिनेट मंत्री आहोत, ओबीसी समाजाबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं अजितदादांनी देखील मान्य केलं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
‘कमरेत लाथे’ची भाषा करणाऱ्या गायकवाडांना भुजबळांनी करून दिली जुनी आठवण…
‘वंचित’चा इन्ट्रीलाच धमाका! संजय राऊतांसमोरच प्रकाश आंबेडकर असं काही बोलून गेले…