कराड – कृष्णानदी पात्रात एका महिलेने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी अकरा वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय 48) रा. रा. विंग, ता. कराड असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील कृष्णा कॅनॉल नजीक नवीन कृष्णा पुलावरून सुनंदा माने यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी टाकल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, सुनंदा माने यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार खराडे करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.