बार्बाडोस : निकोलस पूरनच्या अर्धशतकी आणि हेल्डन वाल्शच्या नाबाद खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्टइंडिजने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अलजारी जोसेफ सामन्याचा मानकरी ठरला.
WEST INDIES WIN THE SERIES!
We are out of words 🤯🤯🤯 A nail biter to the very end! Comment your reaction with an emoji below! #MenInMaroon🌴 #WIvIRE #ItsOurGame pic.twitter.com/foWwssb5Rv— Windies Cricket (@windiescricket) January 10, 2020
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २३७ धावा केल्या होत्या. आयर्लंडकडून फलंदाजीत पाॅल स्टर्लिंगने सर्वाधिक ६३ तर सिमी सिंहने ३४, केविन ओ ब्रायनने ३१ आणि विलियम पोर्टरफील्डने २९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत अलजारी जोसेफने ३२ धावांत ४ तर शेल्डन काॅटरेलने ५१ धावांत ३ गडी बाद केले.
WI need 238 runs to win the match and 🧹 the Colonial Medical Insurance ODI series! Will the #MenInMaroon do it? #WIvIRE #ItsOurGame 👏🏽 pic.twitter.com/hRpqt8DEpH
— Windies Cricket (@windiescricket) January 9, 2020
प्रत्युत्तरात वेस्टइंडिने निकोलस पूरनच्या ५२, कायरन पोलार्डच्या ४०, शाइ होपच्या २५ आणि हेल्डन वाल्शच्या नाबाद ४६ खेळीच्या जोरावर ४९.५ षटकांत ९ बाद २४२ धावा करत मालिकेतील दुसरा विजय नोंदविला. आयर्लंडकडून गोलंदाजीत सिमी सिंहने ३, एंडी मैक ब्राइनने आणि बैरी मैकार्थीने प्रत्येकी २ गडी बाद केले.