ओमान : गोलंदाजाच्या अचूक मा-यानंतर फलंदाजांच्या आश्वासक खेळींच्या जोरावर संयुक्त-अरब-अमीरातने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ स्पर्धेतील चौथ्या सामन्यात नामीबियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. गोलंदाजीत ५ बळी पटकवणारा संयुक्त-अरब-अमीरातचा अहमद रजा हा सामन्याचा मानकरी ठरला.
Ahmed Raza guides UAE to biggest ODI win in 26 years as they crush Namibia in World Cup League Two https://t.co/M8bRT21b5H via @TheNationalUAE
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) January 10, 2020
नामीबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. संयुक्त अरब अमीरातच्या अहमद रजाने ५ तर डेरियस डी सिल्वाने ३ गडी बाद करत नामीबियाचा डाव २९ षटकांत ९४ धावांवर रोखला. नामीबियाकडून जे.जे. स्मितने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली.
#UAE's Captain turns up the dial to take 5 wickets (26 runs) off his 8-overs, backed by a strong support-cast in D'Silva (3/22) & Aravind to restrict @CricketNamibia1 to 94 all-out.
Best we get cracking with that willow!
Detailed scorecard 👉 https://t.co/cYPJlz58fH pic.twitter.com/vgpesaSrMV
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) January 9, 2020
त्यानंतर संयुक्त अरब अमीरातने १९.३ षटकांत ९५ धावा करत एका सोप्या विजयाची नोंद केली. अमीरातकडून फिजी जाॅनने नाबाद ३२ धावांची खेळी केली, तर चिराग सुरीने १७, डी सिल्वाने नाबाद १२ आणि वृत्ति अरविंदने २९ धावा केल्या.नामीबियाकडून गोलंदाजीत जे. स्मित आणि बर्नांड स्कोल्टजने प्रत्येकी १ गडी बाद केला.