मुंबई – काही दिवसांपूर्वीच ‘महिला प्रीमियर लीग’च्या पहिल्या सत्रासाठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रकही जाहीर केले होते. महिला प्रीमियर लीगच्या या पहिल्या सत्रात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने 23 दिवसांच्या कालावधीत खेळवले जातील. मुंबईचे डी.वाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 11-11 सारखेच सामने होतील. तर, 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
दरम्यान, पुरुषांच्या आयपीएलमधील चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्येही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला कर्णधार म्हणून खरेदी केलं आहे. अश्यातच, मुंबई इंडियन्सने आपली निळ्या रंगाची खास जर्सीही सर्वांसमोर आणली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरून या जर्सीची पहिली झलक सर्वांसमोर आणली आहे.
मुंबईची ही जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच दिसते. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. तसेच, यावर मुंबई इंडियन्स संघाचा लोगो सुद्धा दिसत आहे. ही जर्सी मुंबईच्या चाहत्यांना खूप आवडल्याचं त्यांच्या सोशल मीडिया कमेंट्सवरुन दिसत आहे.
🌅- here’s to sun, the sea, the blue-and-gold of Mumbai. Here’s to our first-ever #WPL jersey and all she brings. 🫶#OneFamily #MumbaiIndians #AaliRe pic.twitter.com/mOmNg0d9hO
— Mumbai Indians (@mipaltan) February 25, 2023
दरम्यान, 4 मार्च रोजी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने महिला प्रीमियर लीगची सुरुवात होईल. त्यानंतर 5 मार्च रोजी चा पहिला डबल-हेडर होईल. त्या दिवशी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तर, या स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.