नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून, सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे. सचिन तेंडुलकर यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ एका खेडेगावातील मुलीचा असून, यामध्ये ही मुलगी मैदानात चौफेर फटकेबाजी करताना दिसत आहे. सध्या खेडेगावातील मुलीच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे. या मुलीची फलंदाजी सूर्यकुमार यादवसारखी दिसत असल्याचं अनेकांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत सचिन तेंडुलकरने लिहिले.., ‘लिलाव कालच झाला… आणि आज सामनाही सुरू झाला? काय प्रकरण आहे. तुझी फलंदाजी बघून खूप मजा आली. सचिनने त्याचा व्हिडिओला #CricketTwitter #WPL आणि @wplt20ला देखील टॅग केला आहे.
Kal hi toh auction hua.. aur aaj match bhi shuru? Kya baat hai. Really enjoyed your batting. 🏏👧🏼#CricketTwitter #WPL @wplt20
(Via Whatsapp) pic.twitter.com/pxWcj1I6t6
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2023
तसेच, सचिनने ट्विटमध्ये असेही सांगितले आहे की, त्याला हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळाला आहे. मात्र, सचिनने ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि या मुलीवर कौतुकांचा वर्षाव सुरु झाला. तसेच, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, क्रिकेटमध्ये महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने संधी आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी बीसीसीआयने यावर्षी महिला आयपीएल स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी मुंबईत 13 फेब्रुवारी 2023 ऑक्शन प्रक्रिया पार पडली. या ऑक्शनमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना आपल्या संघात सामील करण्यासाठी फ्रंचायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली होती. यामध्ये स्मृती मंधानाला सर्वाधिक 3.4 कोटी रुपये मिळाले आहेत.