भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर होत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला आणि दुसरा सामनाही जिंकून त्यांना मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे.
या सामन्यात भारतीय संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजचा संघही दोन बदलांसह मैदानात उतरला आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे :-
वेस्ट इंडिज :- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथानाज, शाई होप (wk/c), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सेल्स.
भारत :- शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.