नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून केली आहे.
खर्गे यांनी म्हटले आहे की संसद सुरक्षा भंगाच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी ओब्रायन करीत होते. त्यासाठी त्यांनी आग्रह धरणे हे अयोग्य नाही. गृहमंत्र्यांनी या विषयावर न बोलणे म्हणजे संसदीय परंपरा आणि नियमांचे उल्लंघन आहे, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या मागण्या पूर्णपणे न्याय्य मागण्या आहेत. गृहमंत्री 13 डिसेंबरच्या घटनांबद्दल प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात बोलू शकतात परंतु त्यांनी संसदेत निवेदनाच्या स्वरूपात काहीही बोलण्यास नकार देणे हे संसदीय परंपरा आणि नियमांचे उल्लंघन आहे. असे खर्गे यांनी या पत्रात म्हटले आहे.
१४ डिसेंबर रोजी ओब्रायन यांना संसदेत गदारोळ केल्याबद्दल निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने लोकसभेतूनही याच कारणास्तव १३ खासदारांना निलंबीत केले आहे