शिक्षकांमुळेच देश महासत्ता बनेल

चिंबळी  -समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून देश, शाळा, विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. तसेच शिक्षकांमुळेच देश महासत्ता बनेलचा असे मत चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी व्यक्‍त केले.

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंल्गिश मेडियम स्कूल व कॉलेजच्या शिक्षकांना व कर्मचारी वर्गाच्या पाठीव कौतुकाची थाप म्हणून दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला, त्यावेळी गवारे बोलत होते. संस्थेच्या सचिव विद्या गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर, विष्णू भद्रे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

शिवाजी गवारे म्हणाले की, शालेय कामकाज पार पाडत असताना शिक्षकांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. शाळेची ऑनलाइन माहिती भरताना तो संगणकतज्ज्ञ बनतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना तो डॉक्‍टर बनतो.

पालकांचे प्रबोधन करताना तो समुपदेशक बनतो, याशिवाय गायक, वादक, निवेदक, खेळाडू, कार्यक्रम व्यवस्थापक या भूमिकाही तो पार पाडतो. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देताना तो दिग्दर्शक बनतो व शेवटी तयार झालेल्या विद्यार्थीरुपी सुंदर कलाकृतीचा तो निर्माता व शिल्पकार बनतो.

या सर्व भूमिका निभावताना त्यातील पायाभूत नियमांची माहिती शिक्षकाला ठेवावीच लागते व त्यामुळेच आजचा शिक्षक समाजासाठी एक दिशादर्शक ठरत आहे. श्री समर्थच्या सर्व शाखांमधील शिक्षक या सर्व भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

या शिक्षकांवर कौतुकाची थाप
सर्वोत्कृष्ट समर्पण : संतोष गवारे. सर्वोत्कृष्ट पर्यवेक्षक : मोनाली मुंगस. सर्वोत्कृष्ट शिक्षक – चिंबळी फाटा शाखा : जीवन साळवे, योगीता पाटील, सोनाली पोळ, शीतल बोरसे, शीतल बोबडे, वैशाली पटले, सुवर्णा बेनके. खराबवाडी शाखा : रूपाली पवार, सोनाली गायकवाड, मेघा झापे, अंकिता बोरकर, फरिंग नाझ, भाग्यशाली खंडेराव, पूजा भुजबळ, विजय साहिल, प्रीती गायकवाड. खांलुब्रे शाखा : अमृता दरवडे, गोविंद गवारे. केळगाव शाखा : सुप्रिया करकर. निघोजे शाखा :अक्षय टेमगिरे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.