छावणीचालकांना अपराध्यासारखी वागणूक देऊ नका

नगर – दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी सरकारने आठवडे सुरू केलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छावणी चालक कर्ज घेऊन चालू ठेवल्या. वेळोवेळी बदललेले नियम, प्रशासनाची धरसोड वृत्ती या सर्वांवर मात करत छावणी चालकांनी छावण्या सुरू ठेवल्या मात्र चालकांना अपराध्यासारखी वागणूक देऊ नका व मनमानीपणाने दंडाच्या आकारणी करू नका अशी मागणी डॉक्‍टर विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

एकट्या नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्‍यात एक कोटी साठ लाखाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे . 70 टक्के रक्कम ही बारकोडींग न केल्यामुळेचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र बारकोडींग करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. कधी बारकोडींगची सामग्री वेळेवर उपलब्ध नव्हती कधी त्यासाठी असलेले ठेकेदार वेळेवर बारकोडींग करू शकले नाहीत. मात्र छावणीतील जनावरांची नोंद ही संख्या जर रोज तलाठी तपासत होते , तसे शेरे असतील तर बारकोडींग केले नाही. त्यासाठी प्रत्येक छावणी चालकाला लाखो रुपयांचा दंड आकारण्यासाठी प्रशासन तत्पर का असा सवाल विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला.

तसेच या दंडासंदर्भात अपील करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी उपस्थित छावणीच्या लोकांच्या निदर्शनास आणून दिले. नाशिक परी मंडळाच्या सर्व चारा छावण्यांमध्ये बारकोडींगचा दंड हा नाशिक जिल्ह्यात सुद्धा लागू केला आहे का ? याविषयी प्रशासनाने माहिती घेण्याच्या सूचना विखे यांनी केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.