ऑस्टिन (टेक्सास) :- अमेरिकेतील इंटर मियामी क्लबकडून खेळताना अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. मेस्सीने यंदाच्या मोसमात या क्लबकडून खेळलेल्या अवघ्या चार सामन्यात तब्बल सात गोल केले आहेत.
यंदाच्या वर्षी झालेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विश्वविजेतेपदात मोलाची भूमिका बजावणारा मेस्सी संध्या अमेरिकेतील इंटर मियामी या फुटबॉल क्लबकडून खेळत आहे. यंदाच्या मोसमात या क्लबकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही मेस्सीच ठरला आहे.
इंटर मियामी क्लबने मेस्सीशी नुकताच करार केला होता. मेस्सी संघात येण्यापूर्वी इंटर मियामी संघ 11 सामन्यांत विजय मिळवू शकलेला नव्हता. मात्र, मेस्सी संघात आल्यावर या स्पर्धेत इंटर मियामी संघ लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे.