नवी दिल्ली – विप्रो कंपनीचा तिसऱ्या तिमाहीतील नफा 2,969 काटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 2,968 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कंपनीच्या महसुलात आणि ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीचा नफा आणि महसूल वाढेल असे कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
दुसरा तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीतील नफ्यामध्ये 1.3 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचे कर्मचारी 41 हजारांनी वाढले.
आता कंपनीत 2 लाख 31 हजार इतके कर्मचारी झाले आहेत. शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ताळेबंद जाहीर केला. शेअरबजारात कंपनीच्या शेअरच्या भावात किरकोळ घट झाली.