Nashik Income Tax Department Raid| आयकर विभागाकडून मागील काही दिवसांपासून विविध भागात छापेमारी सुरू आहे. नांदेडनंतर नाशिकमध्येही एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने छापेमारी केली. त्यानंतर येथून तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.
नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफा व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह आणि त्याच्या डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग 30 तास तपासणी केली. नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर पथकाने ही कारवाई केली आहे.
रक्कम मोजण्यासाठी लागले तब्बल 14 तास
जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले आहेत. यावेळी जवळपास 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरु केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथे असलेल्या आलिशान बंगल्यातही आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आले. Nashik Income Tax Department Raid|
#WATCH | The Income Tax Department launched a raid on Surana Jewellers in Nashik, in response to alleged undisclosed transactions by the proprietor. About Rs 26 crore in cash and documents of unaccounted wealth worth Rs 90 crore have been seized in raids carried out by the Income… pic.twitter.com/lnv9wAGi3N
— ANI (@ANI) May 26, 2024
यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. तसेच मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले.
नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. Nashik Income Tax Department Raid|
नांदेडच्या कारवाईत 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त
आयकर विभागाने 13 मे रोजी नांदेड शहरातही अशाच प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईत आयटी विभागाने तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. यासह 14 कोटी रोख स्वरुपात तसेच 8 किलोचे दागिनेही या कारवाईत जप्त करण्यात आले होते. Nashik Income Tax Department Raid|
हेही वाचा:
‘नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा, देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न’ या बड्या नेत्याचा गंभीर दावा