Game Zone Fire Accident | गुजरातमधील राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच राजकीय व्यक्तींनी या आगीवर शोक व्यक्त केला आहे.
यासोबतच राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. या संदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली आहे.
पोलिसांनी राजकोट गेम झोनचा ऑपरेटर आणि मालकासह 3 जणांना अटक केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी 5 अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. या गेमिंग झोनचे मालक युवराज सिंग सोळंकी असून नितीन जैन व्यवस्थापक असल्याचे समोर आले आहे. या दोघांशिवाय पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.
Extremely distressed by the fire mishap in Rajkot. My thoughts are with all those who have lost their loved ones. Prayers for the injured. The local administration is working to provide all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाउंटवर पोस्ट करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेने अत्यंत व्यथित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासोबत माझे विचार आहे. जखमींसाठी प्रार्थना देखील पीएम मोदींनी केली आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. Game Zone Fire Accident |
तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राजकोट आगीच्या घटनेबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “गुजरातमधील राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने मला खूप दुःख झाले. लहान मुलांसह ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.” Game Zone Fire Accident |
दरम्यान, गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील कलावद येथील गेमिंग झोनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. विकेंड असल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह गेम झोनमध्ये गेली होती. गेमिंग झोनमध्ये अचानक आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. ही आग इतकी भीषण होती, तिचे पाच किलोमीटर अंतरापर्यंत धुराचे लोट दिसत होते. आता आग विझवण्यात आली असून ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.
हेही वाचा: