नवी दिल्ली – सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. त्यानुसार कंपनीला तिसऱ्या तिमाहीत मिळालेला नफा 11.8 टक्क्यांनी वाढून 5,109 कोटी रुपये झाला आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल ते 20 टक्क्यांनी वाढून 31,867 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा महसूल 25,927 कोटी रुपये होता.
आगामी तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 20 टक्क्यांनी वाढेल असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 5,197 कोटी रुपयांचा नफा झाला होता.