पिंपरी – गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढत असल्याने शहरात हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. आता थंडी काही प्रमाणात वाढणार आहे.
सध्या वातावरणात धुरकटपणा वाढला आहे. त्यामुळे जमिनीवर कमी सूर्यप्रकाश येतो आणि दिवसाचेही तापमान कमी होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात आणखी थंडी वाढेल. जिल्ह्यात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अजून थंडी वाढण्याची शक्यता आहे. उद्यापासून (दि.6) शहराच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेली काही दिवसांपासून शहरातील वातावरण ढगाळ राहत असल्याने वातावरणातील उकाडा वाढला होता.
तर रात्री मात्र तापमान घसरत असल्याने थंडी जाणवत होती. आता राज्याच्या विविध भागांतील तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे. याशिवाय सकाळी जिल्ह्याच्या काही भागांत धुकेदेखील पडू लागले आहे.