#CWC19 : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान बळकट करण्यासाठी भारताची बांगलादेशविरूद्ध आज कसोटी ठरणार आहे. दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे.

विश्वचषकातील भारत विरूध्द बांगलादेश अशा महत्वपूर्ण लढतीस काहीच वेळात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताने आतापर्यंत बांगलादेशविरूद्ध 36 सामन्यांपैकी 29 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांना बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साहजिकच बांगलादेशचे खेळाडू येथे चांगली झुंज देतील असा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.