मुंबई – फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. पावसात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच. पावसाळ्यात फुटबॉल खेळताना अनेक मुले दिसतात. परंतु, तुम्ही कधीही गायीला फुटबॉल खेळताना पहिले आहे का? नाही ना. पण, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक गाय फुटबॉल खेळण्याची मजा घेताना दिसत आहे. गायीलाही कदाचित पावसात फुटबॉल खेळतानाच मोह आवरला नसावा.