लंडन :- ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरने येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अपेक्षित विजय मिळवत आगेकूच केली आहे. तिने पहिल्या फेरीच्या लढतीत पोलंडच्या मेग्देलना फ्रेचचा 6-3, 6-3 असा पराभव केला.
दुसरीकडे पुरुष एकेरीत ब्रिटनच्या अँडी मरे यानेही पहिल्या फेरीत रायन पेनीस्टनवर 6-3, 6-0, 6-1 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर 6-0, 6-2, 7-5 असा सहज विजय नोंदवला.
यंदाच्या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानला जात असलेला अल्कराझ चांगलाच भरात असून त्याने चार्डीला एकही संधी दिली नाही. इटलीच्या जेनीक सिन्नरने जुआन मॅन्युअल सेरुदोलोवर 6-2, 6-2, 6-2 अशी मात केली. या लढतीत अल्कराझने सिन्नरच्या महत्त्वपूर्ण सर्व्हिस भेदल्या व त्यामुळेच हा सामना एकतर्फी ठरला.
यंदाच्या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सातत्याने पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे अनेक सामने थांबवावे लागत आहेत. अशा वेळी संपूर्ण कोर्ट कव्हर केले जाइल अशी व्यवस्था का केली जात नाही, असा सुर पॅट कॅशसह अनेक माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी लावला होता.
रायबाकिनाची कडवी लढत..
कझाकस्तानची स्टार खेळाडू एलेना रायबाकिनाला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. रायबाकिना हिने शेलबाय रॉजर्स हिचे आव्हान तीन सेटमध्ये संपुष्टात आणले. मात्र, या लढतीत रॉजर्सने पहिला सेट जिंकत रायबाकिनावर मोठे दडपण आणले होते. मात्र, अनुभवाच्या जोरावर रायबाकिनाने हा सामना 4-6, 6-1, 6-2 असा जिंकला व दुसरी फेरी गाठली.