लंडन :- सर्बियाचा जागतिक अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने अपेक्षेप्रमाणे मानाच्या विम्बल्डन टेनिस ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यंदाची फ्रेंच स्पर्धा जिंकलेल्या जोकोविचलाच या स्पर्धेचाही संभाव्य विजेता मानले जात आहे.
उपउपांत्य फेरीत्या सामन्यात जोकोविचने रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हवर 4-6, 6-1, 6-4, 6-3 असा विजय मिळवला. या सामन्यात जोकोविचने पहिला सेट गमावला होता. मात्र, अनुभव जिद्दीच्या जोरावर नंतरचे सलग तीन सेट जिंकत त्याने थाटात विजय मिळवला व उपांत्य फेरी गाठली.
या फेरीत त्याचा सामना इटलीच्या जेन्नीक सिन्नरशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिन्नरने रशियाच्या रोमन रिस्तोविकचा 6-4, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.
महिला एकेरीत पोलंडच्या अव्वल मानांकित इगा स्वेटेकला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने 7-5, 6-7, 6-2 असे पराभूत केले. त्यामुळे गेल्या चारपैकी तीन वर्षांत फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या स्वेटेकला प्रथमच विम्बल्डन जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले.
अन्य लढतीत चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वंद्रुसोव्हाने मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेग्युलाचा 6-4, 2-6, 6-4 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.