लंडन – जागतिक टेनिसमध्ये सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या विंबल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत ट्युनिशियाच्या ओन जेबुर व चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वंद्रोयुसोव्हा यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात जेबुरने सनसनाटी निकाल नोंदवताना बेलारूसच्या संभाव्य विजेत्या आर्यना सबालेन्काचा 6-7, 6-4, 6-3 असा पराभव केला.
या सामन्यात जेबुरने पहिला सेट गमावल्यावर सामन्यात थाटात पुनरागमन केले व नंतरचे दोन्ही सेट जिंकत सामन्यातील विजयासह अंतिम फेरी गाठली.
उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत वंद्रोयुसोव्हाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा 6-3, 6-3 असा सहज सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.