पुणे, दि. 11 – चांदणी चौक येथील सध्याचा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाहतुकीचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या चांदणी चौक उड्डाणपूल आणि सेवा रस्त्याचे काम प्राधिकरणाकडून प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाचा एक भाग असलेला अस्तित्वातील अरुंद पूल पाडून तेथे 115 मीटर लांब व 36 मीटर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू असून पौड येथून येणारी वाहने या पुलावरून पाषाणच्या दिशेने जाऊन पुन्हा डावीकडे वळून सातारा महामार्गावर येऊन कोथरुड अथवा वारजेच्या दिशेने जातात. पूल पाडल्यानंतर पुढीलप्रमाणे वाहतुकीचे नियोजन केलेले आहे.
एनडीए/ मुळशी ते बावधन पाषाण- वारजे -एनडीए व मुळशीकडून पाषाण बावधन कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरून रॅम्प क्रमांक 1 वरुन सोडण्यात येईल.
एनडीए/ मुळशी-मुंबई एनडीए- मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक रॅम्प क्रमांक 3 मार्गे रॅम्प क्रमांक 7 वरून सोडण्यात येईल.
सातारा ते बावधन/पाषाण ही वाहतूक वाहतूक रॅम्प क्रमांक 7 ते मुळशी रोड व त्या पुढे नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन रॅम्प क्रमांक 1 बावधन पाषाण कडे सोडण्यात येईल.
सातारा ते एन.डी.ए. / मुळशी कडील वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरुन एनडीए. चौकातून एनडीएकडे व पुढे मुळशीकडे सोडण्यात येईल.
सातारा ते कोथरुड ही वाहतूक वेदविहार सेवा रस्त्यावरुन अस्तित्वातील कोथरुड अंडरपास मार्गे सोडण्यात येणार आहे.
इतर रॅम्प व हाय-वेवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
मुंबई ते बावधन / पाषाण-कोथरुड मुंबई ते बावधन/पाषाण ही वाहतूक पाषाण “कनेक्टर’वरून सोडण्यात येईल. मुंबई ते कोथरुड ही वाहतूक अस्तित्वातील कोथरुड रॅम्पवरुन सोडण्यात येणार
मुंबई ते मुळशी ही वाहतूक कोथरुड अंडरपास एन.डी.ए चौकमार्गे मुळशीकडे सोडण्यात येईल.
बावधन/पाषाण ते मुंबई येथील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर-कोथरुड अंडरपासमार्गे वेदविहार एनडीए रस्त्याकडून मुंबई हाय-वेवर जोडण्यात येईल.
बावधन/पाषाण ते सातारा वारजे येथील वाहतूक पाषाण कनेक्टरनंतर-हाय-वेवरुन सातारा व वारजेकडे सोडण्यात येईल.
कोथरुड ते मुंबईकडील वाहतूक कोथरुड अंडरपास ते वेदविहार एन.डी.ए. रस्त्यावरुन ते हायवेवर जोडण्यात येईल.