मराठीतला मास्टरपीस ‘अशी ही बनवाबनवी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का ?

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली आहे. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट रुपेरी पाड्यावर आला होता. चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

@supriyapilgaonkar ? #sachinpilgaonkar #supriyapilgaonkar #shriyapilgaonkar #bestcouple #marathicouple #❤️

A post shared by Sachin Pilgaonkar (@sachinpilgaonkar) on


मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या पिढीने देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या जुने चित्रपट पुन्हा एकदा नव्या अंदाजात रिमेक बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा ट्रेण्ड आहे.

त्यामुळे या लोकप्रिय ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचाही रिमेक बनवणार का असा प्रश्न एका चाहत्याने सचिन पिळगावकर यांना विचारला असतात,’अशी ही बनवाबनवीचा रिमेक नाही बनू शकत. कारण आपण ‘लेजंड्स’ गोष्टींना हात लावू नये. आगीशी कधीच खेळू नये. कारण मग त्याची तुलना केली जाईल आणि मग मलाच शिव्या खावे लागणार. ते कशाला करायचं. त्यापेक्षा जे आहे ते राहू द्यायचं.’

 

View this post on Instagram

 

31 Wonderful Year’s Of Ashi Hi Banwa Banwi #marathi #marathifilm #maharashtra #mumbai

A post shared by Sachin Pilgaonkar (@sachinpilgaonkar) on


सचिन पुढे म्हणाले,’ताजमहाल संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे. त्याला एखादी जरी विट लागली तर त्याचं सौंदर्य निघून जाणार. त्यामुळे अशी ही बनवाबनवी ज्या काळात बनला, ती वेळ, परफेक्ट कास्टिंग, लेखक वसंतराव सबनीस आणि प्रत्येक गोष्टीची भट्टी जमली. म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. हिंदीतही अनेकांनी रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडावर आपटले. त्यामुळे आपण रिमेक बनवू नये असं मला वाटतं.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.