मुंबई – मुंबईत भाजप नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथील कार्यालयात घडला आहे.
Maharashtra: A female BJP worker was sexually harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15. Based on the woman's complaint, an FIR was registered at Borivali Police Station yesterday
— ANI (@ANI) September 23, 2021
भाजपा कार्यकर्त्याविरुद्ध बोरीवली पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ही घटना स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला घडली होती. महिलेने तक्रार दाखल करून सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा या महिलेचा आरोप आहे. तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आरोपीने सदर महिलेला भेटण्यासाठी भाजपा कार्यालयात बोलावले. त्यानंतर आरोपीने कार्यालयाचे शटर बंद केले. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.