रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; स्थानकावरील गर्दी कमी होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी  सेवा सुरु करत  असून प्रवाशांना याचा  वेळोवेळी लाभ मिळताना दिसत आहे. त्यातच आता रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी बायोमेट्रिक टोकन मशीन सेवा सुरू केली आहे.

प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच रेल्वेत जागा मिळवण्यासाठी होणारी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नुकतीच बायोमेट्रिक टोकन मशीन सेवा सुरू केली. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर प्रथमच ही सेवा सुरु करण्यात आली आहे. नव्याने बसवलेल्या बायोमेट्रिक टोकन मशीनमुळे मोठ्या रांगा लागून होणारी गैरसोय टाळता येणार आहे. आरक्षण नसलेल्या बोगीत जागा मिळवण्यासाठी होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्याच्या हेतून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

रेल्वे विभागाने सुरु केलेली ही सुविधा वापरण्यासाठी सर्वप्रथम, मशीन प्रत्येक प्रवाशाची माहिती रेकॉर्ड करते. ज्यामध्ये त्यांचा पीएनआर क्रमांक, रेल्वे क्रमांक प्रवासाचे अंतिम ठिकाण रेकॉर्ड करते. यानंतर, फोटो आणि फिंगर प्रिंटने बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. एकदा ही माहिती मिळवल्यानंतर, मशीनद्वारे अनुक्रमांकासह टोकन स्वयंचलितपणे तयार केले जाते. त्यानंतर टोकणवर मिळालेल्या क्रमांकाच्या बोगीतच प्रवाशांना चढावे लागेल. याव्यतिरिक्त, रेल्वेमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी, बायोमेट्रिक टोकन मशीनद्वारे संग्रहित केलेली माहिती देखील उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला सुद्धा आळा घालता येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बायोमेट्रिक टोकन मशीनमुळे जनरल क्लासच्या डब्यात प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तासंतास रांगेत उभे राहण्याचे कष्ट प्रवाशांना घ्यावे लागणार नाही. एकदा टोकन प्राप्त झाल्यावर, रेल्वे सुटण्यापूर्वी 15 मिनिटे आधी बोगीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच द.म.रे. विभागाने असाही दावा केला आहे की, बायोमेट्रिक टोकन मशीन प्रणालीमुळे रेल्वे सुरक्षा दलावरील कामाचा ताण देखील कमी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.