शिक्षकांच्या समस्या सोडविणार

आ. शिवेंद्रसिंहराजे; नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कुडाळ – ज्ञानदानाचे काम शिक्षकांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असते. आजच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी शिक्षकांशिवाय पर्याय नाही. उज्ज्वल भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्याही अनेक समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले असून जावली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकहित साधले जाईल आणि त्यासाठी आपण नेहमीच सहकार्य करु, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

जावली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या सभासदांची सहविचार सभा कुडाळ (ता. जावली) येथे नुकतीच झाली. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आगामी तीन वर्षांसाठी जावली तालुक्‍याची कार्यकारिणी निवड बिनविरोध आणि सर्वानुमते जाहिर करण्यात आली.

या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुका नेते अनिल दरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे, कार्याध्यक्ष विजय बांदल, सरचिटणीस तानाजी आगुंडे, उपाध्यक्ष सुनिल शिंदे, गणेश कदम, ज्ञानेश्‍वर शिर्के, कोषाध्यक्ष शांताराम ओंबळे, सहचिटणीस शेळके, संघटक संतोष कदम, धोंडिबा मोरे, महेश पालकर, संपर्कप्रमुख नितीन मोहिते, प्रवक्‍ता बालाजी बोथींगे, प्रसिध्दी प्रमुख शामराव जुनघरे, ऑडीटर सचिन पवार, संदीप फरांदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सदस्या सौ. अर्चना रांजणे, जावली पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी, विजय सुतार, कांताताई सुतार, सौरभ शिंदे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)