न्यूयॉर्क – जागतिक स्तरावर सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कार सोहळा ओळखला जातो. हा सोहळा काल अखेर पार पडला. मात्र या कार्यक्रमाला एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या भर कार्यक्रमात कानशिलात लगावली होती.
या घटनेनंतर याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत क्रिस रॉकची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, अजून सुद्धा या घटनेची चर्चा होताना दिसत आहे. आता या घटनेचा संबंध शिवसेने थेट राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. शिवसेनेनं भाजपा नेत्यांना “देशी क्रिस रॉक’ म्हंटल आहे.
तर, दुसरीकडे शिवसेनेनं शिवसैनिकांची तुलना विल स्मिथसोबत केली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान, रॉक याने केलेली मस्करी विल याला असह्य झाली आणि त्याने एखाद्या विद्रोही शिवसैनिकाप्रमाणे क्रिस रॉकवर हल्ला केला,” असा उल्लेख या लेखामध्ये करत विल आणि शिवसैनिकांची तुलना करण्यात आली.