संजू नोकरीचं आणि घराचं कर्तव्य पार पाडणार का.? ; संजूची आगळीवेगळी वटपौर्णिमा…

मुंबई- ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात.

मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये संजू आणि लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.

संजूची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळी असणार आहे. नोकरीचं आणि घराचं कर्तव्य संजू पार पाडताना दिसणार आहे. यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे. कशी साजरी केली संजूने वटपौर्णिमा नक्की बघा २४ – २५ जून रोजी संध्या ७.०० वा. राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये.

र, सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार ? घरच्यांना कसे सांभाळणार ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली सोम – शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर. नक्की बघा मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग कलर्स मराठीवर.

राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे.

राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजुसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत. पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजु उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले.

गुलाब संजुच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे. त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब आहे तर दूसरीकडे कुसुमावतीला देखील संजुने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

अभि – लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यु आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. 

आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार. कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे.

की यांचे लग्न खोट आहे. आता पुढे काय घडणार ? अभि लतिका कसे घरच्यांना सामोरे जाणार जाणून घेण्यासाठी बघा सुंदरा मनामध्ये भरली सोम – शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.